Ad will apear here
Next
डॉ. अरविंद बुरुंगले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
नेहरू युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, पद्मश्री डॉ. सुदाम काटे यांच्या हस्ते डॉ. अरविंद बुरुंगले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन, अरुण दादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

नेहरू युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, पद्मश्री डॉ. सुदाम काटे यांच्या हस्ते डॉ. अरविंद बुरुंगले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. अरविंद बुरुंगले यांना नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार, सृजन कलामंच शैक्षणिकरत्न पुरस्कार, तसेच ग्लोबल एज्युकेशन फेलो ऑफ इंटरनॅशनल असोसिएशन सायन्स इम्पॅक्ट पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सर्व मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर सेवक आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZVXCE
Similar Posts
‘वृक्षसंवर्धन काळाची गरज’ पुणे : ‘वृक्षांमुळे मानवी जीवन आरोग्यदायी बनते. प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार देणारा विभाग आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केले.
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात ७०वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गुरुवार, पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाहू कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. शोभा इंगवले उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ
एस. एम. जोशी महाविद्यालयात रक्तदान शिबिर पुणे : ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदानाने तिघांचे जीव वाचतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे,’ असे आवाहन झेड प्लस हॉस्पिटलचे डॉ. राहुल झांजुर्णे यांनी केले. रोटरी क्लब, हडपसर सेंट्रल आणि एस. एम. जोशी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language